– ‘राजमाता जिजाऊ’ बस प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल
सचिन चौरसिया, रामटेक :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज ‘राजमाता जिजाऊ’ या बस सेवेचा लोकार्पण सोहळा नुकताच राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते पार पडला. या बस सेवेचे लोकार्पण झाल्यानंतर राज्यमंत्री जयस्वाल यांनी उपस्थीत मान्यवरांसह बसमधून प्रवास केला. याप्रसंगी डेपोतील कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर बरोबरच प्रवाशांना दळणवळणाच्या सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. रामटेक आगारात पुन्हा १० बसेस आणणार आहे. असेही त्यांनी सांगितले. अनेकदा प्रवाशांना उभं राहून संपूर्ण प्रवास करावा लागतो. पण आता राजमाता जिजाऊ बस सेवेमुळे बसच्या संख्येत वाढ होणार आहे. राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली ही बस सेवा म्हणजे जनतेच्या सेवेसाठी घेतलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या आधुनिक बस सेवेमुळे प्रवाशांना अधिक वेगवान, सुरक्षित, आरामदायी व सुसज्ज प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून, ग्रामीण व शहरी भागांना अधिक सक्षमपणे जोडण्यास मदत होईल. सदर कार्यक्रमासाठी रामटेकचे नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन, राज्य परिवहन नागपूर यंत्र अभियंता महेंद्र नेवारे, रामटेक आगार व्यवस्थापक गौरीशंकर भगत, सभापती सुमित कोठारी, यु. उप. प्रमुख कमलेश शरणांगत, सभापती विश्वास पाटील, शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख रश्मी काठीकर, शिवसेना रामटेक शहर प्रमुख राजेश किंमतकर, सभापती सुरेखा माकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश धोपटे, नगरसेविका नलिनी चौधरी पद्मा अंबादे, दिक्षा शेंद्रे,नगरसेवक पंकज लिल्हारे, रामटेक आगार चे कर्मचाऱ्यांसह शिवसेना, युवासेना, शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.