किशोर साहू,मौदा, ता. २९ :- गट ग्रामपंचायत धामणगाव येथील कार्यालयात दिवाळी पंचमी निमित्त लक्ष्मीपूजनाच्या कार्यक्रम आटोपून गावातील वंचित घटकातील व गरजू लहान मुलांना नवीन पोशाखाचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच अक्षय पंचबुधे ,उपसरपंच राकेश मोटधरे, सचिव कैलास निकुरे, ग्रामपंचायत सदस्यगण बलदेव नारनवरे, अजित कडू, निलेश मोटधरे, श्याम नारनवरे ,रंजना मनोज कुकडे, संतोषी अरविंद बागडे ,प्रियंका प्रमोद जुमळे, पल्लवी धनराज राऊत ,पल्लवी गुंडेराव डोंगरे, संगीता संजय नारनवरे, ग्रामपंचायत कर्मचारी सागर मोटधरे सह इतरही कर्मचारीवृंद उपस्थित होते.




