spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त परमात्मा एक सेवक मंडळ तर्फे चाचेर येथे आज भव्य रक्तदान शिबिरासह इतरही भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन 

किशोर साहू,मौदा,ता.११:- कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मौदा तालुक्यातील गावागावात दरवर्षीप्रमाणे यंदाही परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळातर्फे हवनकार्यासह चर्चासत्र, महाप्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.चाचेर शाखेतील परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ तर्फेही कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशाप्रमाणे मार्गदर्शक धर्मराज बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोजागिरी कार्यक्रम शनिवार( दि. 11 ऑक्टोंबर )ला आयोजित केलेला आहे. यानिमित्ताने सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिरासह इतरही भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सकाळी दहा ते साडेअकरा वाजेपर्यंत हवनकार्य, साडेअकरा ते बारा वाजेपर्यंत भगवंताच्या व बाबांच्या फोटोचे पूजन, दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत भगवत कार्याची चर्चासत्र, चर्चासत्रा नंतर लगेच तीर्थप्रसाद व सामूहिक भोजन, रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत परमपूज्य परमात्मा एक सेवक नाट्य मंडळ कोंडा कोसरा प्रस्तुत तीन अंकी नाट्यपुष्य विनाश अर्थात मार्ग घेतला स्वार्थासाठी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती आपल्या सोशल मीडियावरील स्टेटस वर ठेवून चाचेर येथील बाबांचे सेवक नंदकिशोर देशमुख यांनी प्रसारित केलेली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.