spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्वामी विवेकानंद जयंती निमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत नागपूर जिल्हा व महानगर तर्फे ‘समर्पण दिवस’ कार्यक्रम संपन्न

– युवाच देशाचे भवितव्य – डॉ. विलास देशपांडे 

नागपूर :- युवा मंनेच भवितव्य घडवू शकतात असे स्वामी विवेकानंद सांगत असत त्यांचे विचार आजही प्रांसंगिक व उपयोगी आहेत. युवावस्था आणि वय याचा संबंध नसतो. मन युवा असले तर युवावस्था कायम असते हाच उत्साह आणि ऊर्जा देशाचे भवितव्य घडवीत असतात असे प्रतिपादन विवेकानंद केंद्राचे संचालक तथा व्ही.एन.आय.टी चे निवृत्त प्राध्यापक डॉ. विलास देशपांडे यांनी केले अखिल भारतीय ग्राहक पंचायत, नागपुर जिल्हा व महानगर कार्यालय लेंड्रा पार्क, रामदास पेठ येथे आयोजित आदर्श सन्यासी योध्या स्वामी विवेकानंद जयंती निमित्त समर्पण दिवस आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते स्वामी विवेकानंद केंद्राचे संचालक डॉ. विलास देशपांडे, प्रमुख अतिथी अ.भा. ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा प्रचार प्रसार आयाम प्रमुख अशोक त्रिवेदी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गजानन पांडे, नागपूर जिल्हा व महानगर कार्याध्यक्ष संजय धमाधिकारी उपस्थित होते.

काम करतांना नकारात्मकता असू नये आज आपल्या विचार विरोधी असणारे आपल्या विचारांचा होऊ शकतो. संवाद हा विनम्रपणे साधला पाहिजे. अपयशाने खचून न जाता काम केले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यकर्ता कसा असावा संघटनेत कार्य करतांना कोणती मुल्ये अंगीकारावीत याबाबत मोलाचे विचार मांडले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे शुभहस्ते स्वामी विवेकानंद यांचे फोटोला माल्यार्पण व दिप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर सर्व कार्यकर्ते यांनी स्वामी विवेकानंद यांचे फोटो समोर अर्थ समर्पण करण्यात आले. अ.भा.ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक त्रिवेदी यांनी संघटनेचा इतिहास, ग्राहक संरक्षण कायद्याबददल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात संजय धर्माधिकारी यांनी नागपूर जिल्हा व महानगर मधील कार्य विस्तार, दररोजच्या ग्राहक समस्यांचे निवारण याबद्दल माहिती दिली. यावेळी अ.भा.ग्राहक पंचायतच्या जेष्ठ कार्यकर्त्या स्व. गौरी चांद्रायण यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर महानगर अध्यक्ष अनिरुध्द गुप्ते, यांनी केले, पाहुण्यांचे स्वागत नागपूर जिल्हा अध्यक्ष गणेश शिरोळे यांनी केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचलन महानगर उपाध्यक्ष समीर जोशी यांनी तर आभार नागपूर जिल्हा सचिव प्रकाश भुजाडे यांनी मानले. या कार्यक्रमाला अ.भा. ग्राहक पंचायतचे जेष्ठ कार्यकर्ते सुधांशु दाणी, प्रमोद भागडे, किरण काळे, महानगर सचिव राजीव पुसदेकर, जिल्हा मार्गदर्शक विनयक इंगळे (हिंगणा), जिल्हा उपाध्यक्ष अजय काठोळे (कळमेश्वर), महानगर उपाध्यक्ष उदय दिवे, जिवन झाडे, जिल्हा उपाध्यक्ष शेख बब्बु (हिंगणा), सुधीर जोशी, महिला प्रमुख  संध्या कुर्वे, निशिकांत ठोंबरे, आनंद मुळे यांचेसह नागपूर जिल्हा व महानगर पदाधिकारी तसेच नागपूर जिल्हयातील तालुक्यांचे पदाधिकारी व नागपुरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. असे कार्याध्यक्ष संजय धर्माधिकार यांनी कळविले.

Popular Articles