spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपाच्या ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियानाला उस्त्फूर्त प्रतिसाद

– ४८ हजार ३४८ किलोग्राम निरुपयोगी वस्तूंचे दान

– ३५ हजारांच्या वर नागरिकांना ‘थँक यू’चे स्टिकर्स

 नागपूर :- स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी या अभियानाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे राबविण्यात आलेल्या अभियानाला नागपूरकरांनी उस्त्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अभियानांतर्गत रविवार १९ ऑक्टोबर पर्यंत शहरातील ३५ हजार २९३ नागरिकांनी तब्बल ४८ हजार ३४८ किलोग्राम निरुपयोगी वस्तूंचे दान स्वीकार केंद्रांवर जमा झाले आहे. नागरिकांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल मनपाने नागरिकांचे आभार व्यक्त केले आहे. याकरिता नागरिकांना ‘थँक यू’ चे स्टिकर्स प्रदान करण्यात आले आहे.

घरोघरी होणाऱ्या दिवाळीच्या साफसफाईतून निघणाऱ्या टाकाऊ वस्तूंनचा सुरक्षित आणि योग्य विल्हेवाट लागावी, तसेच त्या गरजूंपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात १०२ ठिकाणी ‘निरुपयोगी वस्तू स्वीकार केंद्र’ सुरू केले आहेत. ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियानामध्ये नागरिकांकडून एकूण ४८,३४८ किलो निरुपयोगी वस्तूचे दान करण्यात आले आहे. यामध्ये कपडे २५९४६ किलो, पेपर आणि पुस्तके ९१८९ किलो, प्लास्टिक वस्तू ५२४४ किलो, ई-वेस्ट ३९९३ किलो, घरगुती भांडी ६५८ किलो, लाकडी वस्तू ९६३ किलो, इतर वस्तू २३५५ किलो असे एकूण ४८ हजार ३४८ नागरिकांनी या केंद्रांवर भेट देऊन दान दिले आहे.

निरुपयोगी वस्तू स्वीकार केंद्र नागरिकांना त्यांच्या घरातील जुने फर्निचर, तुटलेले प्लास्टिकचे सामान, ई-कचरा आणि इतर निरुपयोगी वस्तू सोपवण्यासाठी हक्काचे ठिकाण बनले आहे. यामुळे हा कचरा रस्त्यावर किंवा कचराकुंडीत न टाकता थेट मनपाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

Popular Articles