– एक दिवस शेती कामाला सुट्टी, बळीराजाच्या हक्कासाठी गुट्टी
प्रफुल मेश्राम, नागभीड :- तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपल्या न्याय्य हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी नागभीड तहसील कार्यालयावर उद्या दिनांक 17 सप्टेंबर ठीक दहा वाजता भव्य ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी या मोर्चात सहभागी होऊन आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मोर्चात सहभागी होण्याचे आव्हान शेतकरी संघटनेकडून करण्यात आले आहे.
मार्ग – तळोधी परिसरातील शेतकरी बांधवांसाठी
साई मंदिर तळोधी ते तहसील कार्यालय, नागभीड.
तसेच नागभीड परिसरातील शेतकरी स्वतःच्या गावापासून ते नागभीड तहसिल कार्यालय पर्यंत.
📢 सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती:**
कामबंद: १७ सप्टेंबर रोजी शेतीची कामे बंद ठेवून मोर्चात सहभागी व्हा.
गावात दवंडी : गावातील लाऊडस्पीकरवरून दवंडी देऊन संदेश पोहोचवा.
ट्रॅक्टरसह उपस्थिती: आपल्या ट्रॅक्टर सह व जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.
सजावट व देखावे: ट्रॅक्टरवर तसेच हातामध्ये मागण्यांचे पोस्टर, शेतकरी देखावे व भजन मंडळ घेऊन यावे.
पाण्याची सोय:प्रत्येक गावातून ट्रॅक्टरसोबत पिण्याच्या पाण्याच्या कॅन घेऊन याव्या.
“शेतकऱ्यांची एकता, हीच आपली ताकद!”





