spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

थर्टीफर्स्टवर पांढरकवडा पोलीसांची करडी नजर

– ठिकठिकाणी फिक्स पॉईंट; वाहनांची होणार कसून चौकशी

सुरज बंडीवार, पांढरकवडा :- सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. परंतु नववर्ष साजरे करतांना नियमांना बगल दिल्यास थेट कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे नववर्षाचे स्वागत उत्साही मनाने परंतु उन्मदाच्या आहारी न जाता शांततेत करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांनी पांढरकवडा शहर वासीयांना केले आहे. थर्टीफस्टला शहर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात अधिकारी, अंमलदार, व गृहरक्षक दलाचे जवान शहरातील विविध भागात तैनात असणार आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नागरिक ३१ डिसेंबरला मोठया प्रमाणात आनंदोत्सव साजरा करत असतात, पण अनेकदा मद्यपान करून वाहन चालविणे सार्वजनिक ठिकाणी दंगामस्ती करणे असे प्रकार घडतात, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता शहर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात येणार आहे. याकरिता वाहतूक शाखेकडून देखील ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे. शिवाय रेकॉर्ड वरील गुन्हेगार यांच्यावर पोलिसांची करड़ी नजर असणार आहे. महत्वाच्या ठिकाणी साध्या वेशातील गुन्हे शाखेचे अंमलदार हे देखील पाळत ठेवणार आहे, संपूर्ण शहरात पोलिसांची गस्त असणार आहे. पांढरकवडा शहर पोलिसांनी थर्टी फस्ट च्या उन्मादावर करडी नजर असून याबाबत विशेष नियोजन केले असल्याची माहिती आहे.

..तर पालकांवर होणार कारवाई !

शहराबाहेर जाणाऱ्या प्रत्येक ठिकाणी पोलीस अंमलदार वाहनांची तपासणी करतील अशावेळी वाहन चालविण्याचा परवाना नसणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी दिल्यास थेट पालकांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांनी सांगितले आहे. नववर्षाच्या स्वागताला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून अधिकारी, अंमलदारांसह रस्त्यावर उतरणार आहे. वेगाने वाहने चालवणारे रायडर पोलिसांच्या विशेष टारगेटवर राहणार आहेत. बार परमिट रूम सुरू राहणार असल्याने मद्यपी आणि अती उत्साही होऊन वाहन चालविणे,गोंधळ घालणाऱ्यावर पोलिसांची नजर राहणार आहे.

Popular Articles