– ११ आरोपीसह पावने पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सुरज बंडीवार, पांढरकवडा :- पिंपळखुटी येथील सम्राट हाँटेलच्या मागे सुरू असलेल्या जुगारावर पांढरकवडा पोलिसांनी कारवाई करत ११ आरोपींना रंगेहाथ पकडले. या कारवाईत एकूण ४ लाख ८९ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दिनांक १६ सप्टेंबर रोजी पांढरकवडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर पोलीस स्टाफ सोबत पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना गोपनीय माहिती मिळाली की मौजा पिंपळखुटी येथील सम्राट हाँटेलच्या मागील मोकळ्या मैदानात झाडाच्या सावलीत काही इसम ५२ पत्त्यांवर जुगार खेळत आहेत. पोलिसांनी कारवाई करत घटनास्थळी धाड टाकली. धाडीत पोलिसांना १) अशोक मोहनलाल परसोया (राय) वय ६० वर्षे रा. आंबेडकर वार्ड, पांढरकवडा ता. केकापूर जि. यवतमाळ, २) अंजनेयलु शिवन्ना मैलारम वय ४५ वर्ष रा. सरस्वतीनगर, आदिलाबाद, ३) मारोती गंगाराम उईके वय ३२ वर्ष रा. चिट्यालबोरी ता. जि. आदिलाबाद, ४) संतोष परशुवार दारशन वय ३५ वर्षे रा. शांतीनगर. आदिलाबाद, ) सैय्यद छोटु सैय्यद जानुमिया वय ३७ वर्ष रा. के. आर. के. कॉलनी, आदिलाबाद, ६) संजय सुदर्शन पुलसवार वय ४० वर्ष रा. रिक्षा कॉलनी, आदिलाबाद, ७) सैय्यद शकील सैय्यद निजाम वय ४० वर्षे रा. जंमगाव मंडल जैनुर जि. आसीफाबाद, ८) मोहम्मद लतीफ मोहम्मद समीर वय ४५ वर्ष रा. सुंदरियानगर आदिलाबाद, ९) शेख रूस्तम शेख जमाल वय ५२ वर्ष रा. रेल्वे गेट, तामसी बस स्टॅण्ड, आदिलाबाद, १०) प्रविण अशोक चांदेकर वय ३५ वर्ष रा. पिंपळरखुटी ता. केळापुर जि. यवतमाळ, ११) इमरान शकुर खिलची वय ४२ वर्षे रा. पाटणबोरी ता. केळापूर जि. यवतमाळ हे जुगार खेळतांना आढळले, या कारवाईदरम्यान सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात १४ हजार ३०० रुपये रोख रक्कम, १० मोबाईल फोन, ५ मोटारसायकल वाहने आणि ५२ पत्त्यांचे गट्ठयाचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ अंतर्गत गुन्हा नोंदवला. सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर, पोलीस जमादार विलास जाधव, पोलीस शिपाई राजु बेलयवार, राजु मुत्यालवार, गौरव नागलकर, राजु गेडाम, विशाल वाढई यांनी केली.




