spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नागपूर :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर व मॉडेल करीअर सेंटर, नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने सोमवार दि. २९ सप्टेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर येथे करण्यात आलेले आहे

सदर रोजगार मेळाव्यामध्ये Tata Consultancy Services (Mihan Nagpur), Moil India Limited. Vindhya E Info Media Pvt.Ltd., Abhinav Institute Of Technology & Management, Just Dial Limited., इत्यादी कंपन्या मार्फत १७७ पेक्षा जास्त जागांसाठी दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, आटीआय, डिप्लोमा इत्यादी पात्रताधारक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची प्राथमिक निवड केली जाणार आहे. याव्दारे जिल्हयातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर रोजगार मेळाव्यामध्ये उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाम घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सुनंदा बजाज यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.