spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नवयुवक उच्च प्राथमिक शाळेत पालक सभेचे आयोजन

कामठी :- ग्रामविकास एज्युकेशन सोसायटी व्दारा संचालित नवयुवक उच्च प्राथमिक शाळा गौतमनगर कामठी येथे दिनांक 18 जुलै 2025 शुक्रवारला सकाळी 11.30 वाजता मुख्याध्यापक विजय नंदनवार यांच्या अध्यक्षतेखाली संस्थाध्यक्ष सिताराम रडके यांच्या विशेष उपस्थितीत भदन्त नागदिपंकर महास्थवीर , संस्था सचिव पंकज रडके ,वंदना गजभिये, वर्षा गजभिये , वर्षा गजभिये , वैशाली जैसवार (पालक प्रतिनिधी ) यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेच्या कार्यालयात संपन्न झाली . याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती , शाळेत विद्यार्थ्यांना नियमित वेळेवर शालेय गणवेशात पाठविणे , चालू शैक्षणिक सत्रात विविध सहशालेय उपक्रम राबविणे ,विविध स्पर्धा परिक्षांना विद्यार्थ्यांना बसविणे समाजकल्याण, आदिवासी वअल्पसंख्याक विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्तीचा लाभ यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

सर्वानुमते शाळा व्यवस्थापन समिती , शिक्षक पालक संघ , परिवहन समिती, शालेय पोषण आहार समिती व सखी सावित्री समिती गठीत करून पदाधिकारी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. करुणा गणवीर यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेषाचे वाटप करण्यात आले संगीता गोडबोले यांनी वर्ग 1 ते 7 मध्ये प्रथम क्रमांक मिळविला त्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तर (स्कूल बॅग ) देऊन गौरविण्यांत आले .पालकांनी अधून मधून शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रगती विषयी चर्चा करण्याचे आव्हाहन मुख्याध्यापक विजय नंदनवार यांनी केले. पालक सभेला अनेक पालक वर्ग उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक , सूत्रसंचालन राजकुमार शेन्डे यांनी तर आभारप्रदर्शन दिलीप मस्की यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राखी बागडे , दिक्षा फुले डोंगरे व विभा सोनडवले यांनी परिश्रम घेतले .


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.