spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विकृतीच्या कळस: १४ वर्षीय मुलीवर अत्याचार ; आरोपी अटकेत

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुण नराधमाने मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आल्याची घटना नगरधन येथे रविवार (दि.१५) उघडकीस आली. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रंजित उर्फ पप्या ओंकार डोकरीमारे (वय २५, रा. नगरधन ता. रामटेक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मुलीच्या कुटुंबीयांनी रामटेक पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. तक्रारदाराची १४ वर्षीय मुलगी महाशिवरात्री असल्याने नगरधन येथील प्रसिद्ध कोटेश्वर मंदिरातून दर्शन घेऊन घरी परत येत असतांना आरोपी रंजित उर्फ पप्या ओंकार डोकरीमारे यांनी तिला थांबवून बळजबरीने आपल्या मोटारसायकलवर बसविले आणि जवळच्या शेत शिवारात नेऊन जबरदस्ती अत्याचार केला. मात्र असाह्य वेदना सुरू झाल्याने पीडित मुलीने झालेल्या घटनेच्या प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ६४, ६४(१) (२) व १३७ (२) तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) २०१२ अंतर्गत कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करत आरोपीला मंगळवारी (ता. १७) नागपूर विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.