खापा :- पीएमश्री न.प. राजेंद्र हायस्कूलमध्ये संविधान दिनानिमित्य विविध उपक्रमांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच संविधान मूल्यांची जागीव दृढ करण्याच्या उद्देशाने भाषण स्पर्धा, रंगोळी स्पर्धा, हस्तकला व चित्रकला स्पर्धा, गीतगायन, कविता वाचन, संविधान जनजागृती रॅली, भारताच्या नकाशाची मानवी साखळी तसेच सेल्फी पॉइंट अशा उपक्रमांना विद्यार्थ्यांचा विशेष प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन मुख्याध्यापक नेहारे यांनी केले. तसेच पर्यबेक्षक खडसे, शिक्षिका चामाटे, असलम खान, भांगरे, इमरान खान, शिक्षिका पारधी, मडके, सावनकर, नंदेश्वर, खोब्रागडे तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विविध स्पर्धाचे आयोजन, देखरेख व नियोजनात महत्वपूर्ण भूमिका बजावली. विद्यार्थ्यांनी उत्साह, ऐक्य आणि सृजनशिलता यांचे उत्तम दर्शन घडवले.
“प्रोत्साहनपर उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार”
कला आणि ज्ञानाचा संगम घडवणाऱ्या या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेच्या पुढाकारामुळे विद्यार्थी घडविण्याचे प्रयत्न अधिक परिणामकारक होत असून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार सर्वांकडून व्यक्त करण्यात आला.




