किशोर साहू, मौदा, ता.२८:- ग्रामपंचायत खात येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण, पूजन करून , मान्यवरांनी त्यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकून संविधान दिन उत्साहात साजरा केला.
याप्रसंगी सरपंचा माधुरी वैद्य, उपसरपंच रवींद्र मांडवकर, सामाजिक कार्यकर्ते लोकेश राखडे, माजी सरपंच कैलास वैद्य, ग्रामपंचायत सदस्य गण राकेश बागडे, अरविंद तांबुलकर , कर्मचारी प्रताप मलेवार सह इतर ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारीवृंद उपस्थित होते.




