किशोर साहू, मौदा :- पीएम श्री जि प उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे शिवजयंतीचा कार्यकम थाटात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश इंगळे, प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रणधीर आंबिलढुके, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष संजय मेहर,प्रमुख पाहुणे विलास भोंडे, मंगेश मलेवार, दिनेश आंबिलढुके, उपस्थित होते .कार्यक्रमाचे अध्यक्ष नितेश इंगळे यांनी दीपपूजन आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी केले.आपल्या प्रास्ताविक भाषणातून विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. शिवाजी महाराजांनी जनतेची कशाप्रकारे सेवा केली याची माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन विनीत आंबिलढुके यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांचे भाषणे झाली .यात काव्या आंबिलढुके अवनी आंबिलढुके, योगराज आकरे, शोर्य भोंडे , सृष्टी अहिरकर मानवी हटवार, नव्या तलमले ,स्वरा हटवार, आविष्का चिंधालोरे,मंथन आंबिलढुके,,या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन प्रसंगावर माहिती दिली. यशस्वी आंबिलढुके या विद्यार्थिनी एकच राजा या गीतावर नृत्य केले. वर्ग चौथीच्या विद्यार्थ्यांनी काव्या आंबिलढुके व तिची चमू ,तसेच वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांनी मानवी हटवार व तिच्या चमूने शिवाजी महाराजांच्या प्रसंगावर सुंदर नृत्य सादर केला.
या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षकवृंद लीलाधर काळबांडे, राजेश रोहाड ,सुधीर कांबळे, सुधीर खंडाईत, सुजाता बोदेले, प्रज्ञा रामटेके, संगीता आंबिलढुके यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यासाठी शिक्षकवृंद उमेश उके, पुष्पलता उके, कैलास फटिंग यांनी विशेष सहकार्य केले.या कार्यक्रमाचे आभार शिक्षक सुधीर कांबळे यांनी केले.




