spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांची चितारओलीला भेट

नागपूर २८ : शहरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, मंडळांकडून गणपती मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी वाजत-गाजत आणल्या जात आहेत. या उत्सवाच्या काळात नागरिकांची सुरक्षा आणि शिस्त राखण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी स्वतः चितारओली येथील परिस्थितीची पाहणी केली.

गणपती मूर्तींच्या वाहतुकीसाठी चितारओली हा नागपुरातील मुख्य मार्ग आहे. येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान असते. याच पार्श्वभूमीवर, डॉ. सिंगल यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

यावेळी त्यांच्यासोबत पोलीस उपायुक्त राहुल मदने, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, सहायक पोलीस आयुक्त अनिता मोरे, कोतवाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रितेश आहेर, तहसील पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख आणि इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित आणि शांततापूर्ण वातावरणात उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

Popular Articles