नागपूर :- हर्ष पोद्दार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा व अनिल म्हस्के, अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारूची विक्री, दारूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करून दारूबंदी कायद्यान्वये एकूण १३ गुन्हे दाखल केले.
पोलीस स्टेशन केळवद येथे आरोपी नामे पंडीतजी बमनोटे, वय-७० वर्ष, रा. वॉर्ड क्रं ०१, केळवद, ता. सावनेर, जि. नागपूर याचेवर ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन सावनेर येथे महीला आरोपी हीचेवर ०१ गुन्हा आहे. पोलीस स्टेशन नरखेड येथे आरोपी नामे राजा गुलाब ईसके, वय ४७ वर्ष, रा. मोवाड, तह. नरखेड याचेवर ०१ गुन्हा आहे. पोलीस स्टेशन काटोल येथे आरोपी नामे हर्षल रमेशराव मानकर, वय ३६ वर्ष, रा. दिग्रस बु. ता. काटोल याचेवर ०१ गुन्हा नोंद आहे., पोलीस स्टेशन जलालखेडा येथे आरोपी नामे १) जगदीश मधुकर भोंडे, वय ४० वर्ष, रा. अंबाडा (सायवाडा) ता. नरखेड जि. नागपुर, २) किशोर दिवाकर धोटे, वय ३० वर्ष, रा. सायवाडा (अंबाडा) ता. नरखेड जि. नागपुर, ३) मिलींद सुधाकर टेंभेकर, वय ३८ वर्ष, रा. दातेवाडी, ता. नरखेड जि. नागपुर ४) निलेश दादाराव ठाकरे, वय ४३ वर्ष, रा. खारगड, ता. नरखेड जि. नागपुर, ५) रोशन दामुजी सर्याम, वय २२ वर्ष, रा. खारगड, ता. नरखेड, जि. नागपुर ६) महादेव रघुनाथ बगडते, वय ५२ वर्ष, रा. अंबाडा, ता. नरखेड, जि. नागपुर, ७) संदिप भिमराव बागडे, वय ३८ वर्ष रा. सायवाडा ता. नरखेड जि. नागपुर याचेवर प्रत्येकी ०१ गुन्हा नोंद एकुण ०७ गुन्हे, पोलीस स्टेशन भिवापुर येथे आरोपी नामे युवराज गुलाब नान्हे, वय ४२ वर्ष, रा. नवेगाव देशमुख. ता. भिवापुर, जि. नागपुर. याचेवर ०१ गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन कन्हान येथे आरोपी नामे राजन नामदेव कोधरै, वय ५७ वर्षे, रा. गाडेघाट वार्ड, क.०३, ता. पारशिवनी याचेवर ०१ गुन्हा नोंद. नमुद कारवाईत एकुण ६१२० मिली देशी दारू, ६ लिटर मोहाफुल दारू असा एकुण ३०७० /- रूपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने नाशवंत मुद्देमाल मौक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला.





