spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हॉटेल रेस्पीरोवर पोलिसांचा छापा; लाखोंचा अवैध माल जप्त

 

संतोष महाजन, कुही १९ : दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री १२.२० वाजता उमरेड उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन (सहा. पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली कुही पोलिसांनी कुही फाट्यावरील हॉटेल रेस्पीरोवर मोठी कार्यवाही केली. गुप्त माहितीच्या आधारे हॉटेलमध्ये छापा टाकण्यात आला असता, ग्राहकांना बेकायदेशीर दारू व हुक्का पुरवला जात असल्याचे उघड झाले.

छाप्यात रु १,०२,६५० किंमतीचा अवैध माल जप्त करण्यात आला. यात १ लीटरची “टलेड २८५ सिग्नेचर” दारूची बाटली ( रु  ८००), १४ हुक्का पॉट ( रु  २१,०००), बॅलेनटाईन व ऑगरमास्टर लेबल असलेल्या दारूच्या बाटल्या ( रु  ८५०), तसेच वापरलेल्या १०० प्लास्टिक खुर्च्या ( रु  ८०,०००) यांचा समावेश आहे.

या प्रकरणी हॉटेलचे मालक अमितकुमार ओमप्रकाश रॉय (रा. नंदनवन, नागपूर)राहुल कटकवार (रा. पारडी, नागपूर), तसेच मॅनेजर सतीश शर्मा आणि किचन मॅनेजर सुनिल ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) व सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने (नियमन) अधिनियम २००३ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक धिरज मसराम यांच्यासह  उमरेड उपविभागातील पोलीस कर्मचार्‍यांनी पार पाडली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.