spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कुस्तीच्या आखाड्यात पोरवाल कॉलेजचा दमदार ठसा!

– तालुकास्तरीय फ्रीस्टाइल स्पर्धेत तीन मल्लांची जिल्हास्तरासाठी निवड

कामठी :- तालुकास्तरीय फ्रीस्टाइल व ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेत एस. के. पोरवाल ज्युनिअर कॉलेजच्या मल्लांनी दमदार कामगिरी करत आपली क्रीडा गुणवत्ता सिद्ध केली. स्पर्धेत उल्लेखनीय प्रदर्शन करणाऱ्या कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या अंतर्गत नागपूर कुस्ती संघ, कामठी तालुका संघ व शालेय क्रीडा कुस्ती विभागाच्या वतीने १ सप्टेंबर रोजी निंबाजी आखाडा, कामठी येथे तालुकास्तरीय फ्रीस्टाइल व ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील मल्लांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले.

यामध्ये १९ वर्षे वयोगटातील ९७ किलो वजन गटात हनी अली शहीद हैदरी, ५७ किलो वजन गटात शौर्य नीरज यादव, तर १७ वर्षे वयोगटातील ५१ किलो वजन गटात कपिल शेंडे यांनी प्रतिस्पर्ध्यांना दमदार लढत देत आपल्या वजन गटात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीच्या जोरावर तिन्ही मल्लांनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली.

या खेळाडूंना महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. मल्लिका नागपुरे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे डॉ. स्वप्नील दहात, उपप्राचार्य वंजारी, पर्यवेक्षक मेंढे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या मल्लांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.