पोरवाल कॉलेजात अमर हुतात्मा सरदार भगतसिंग यांना शत -शत अभिवादन!

0
1

कामठी :- स्थानिक सेठ केसरिमल पोरवाल महाविद्यालयाच्या विशेष दिवस कार्यक्रम समितीतर्फे हुतात्मा सरदार भगतसिंग यांच्या 119 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरवातीला हुतात्मा भगतसिंग याच्या तैलचित्राला माल्यार्पण व पुष्पाजली पुष्पांजली वाहून शत -शत अभिवादन करण्यात आले. विशेष दिवस कार्यक्रम समितीचे समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र सावजी तागडे यांनी भगतसिंग यांच्या क्रांतिकारी कार्यांचा परिचय देतांना ब्रिटिश राजवटीत दिल्लीच्या केंद्रीय विधी मंडळात बॉम्ब फेकण्यामागचा त्यांचा उद्देश्य स्पष्ट केला. महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रम अध्यक्ष प्रा. डॉ. स्वप्नील दाहात यांनी सरदार भगतसिंग द्वारा स्थापित “नौजवान भारत सभे”चा उल्लेख करतांनी या महान हुतात्म्याच्या जीवनातून तरुणांनी त्याग, बलिदान व देशभक्तीची वृत्ती स्वीकारण्याचे आव्हान केले. यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या “इंकलाब झिंदाबाद”च्या नार्‍यांनी सभागृह दुमदुमले. याप्रसंगी आय.कयू.ए.सी. समन्वयक डॉ. प्रशांत धोंगळे, प्रा. डॉ. जयंत रामटेके, प्रा. डॉ. सिद्धार्थ मेश्राम, डॉ. महेश जोगी, डॉ. विनोद कांबडी आणि विद्यार्थ्यी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धम्मदिना बोरकर तर आभार ग्रंथपाल शिल्पा हिरेखण यांनी मानले.