गोंदिया :- जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्ष तसेच शेतकरी च्या वतीने आज तिरोडा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
तिरोडा तहसीलदार ठाकरे यांना मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन देण्यात आले. प्रमुख मागण्यामध्ये धान उत्पादक शेतकरी च्या कृषी पंपांना 24 तास विद्युत पुरवठा द्यावा तसेच सोलरची अट रद्द करावी. बोनसची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना खात्यात जमा करावी. तसेच रब्बी व धानाचे खरीप हंगामाचे पैसे तात्काळ खात्यावर शेतकऱ्यांच्या जमा करावे. मावीम सीआरपीएफचे मानधन तात्काळ जमा करावे. अदानी अवैध कोळसा राख वाहतूक सुधारणा करावी असे विविध मागणी धरून आज तिरोडा तहसील कार्यालयावर प्रहार जनशक्ती व शेतकरी यांनी मोर्चा काढला होता या मोर्चामध्ये प्रहार जनसक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर सह शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी मोर्चात सहभागी झाले होते.




