spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रवीण बागडे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

बुलढाणा :- लेखक, कवी व सामाजिक विश्लेषक प्रवीण मोरेश्वर बागडे, नागपूर यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि वैचारिक योगदानाची दखल घेत त्यांची ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. साखरखेर्डा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथे दिवंगत वृक्षमित्र मधुकरराव खंडारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा निवड समितीने बागडे यांच्या कार्याची सखोल दखल घेत एकमताने त्यांची निवड केली आहे.

सामाजिक प्रश्नांवरील निर्भीड लेखन, साहित्यिक योगदान, सामाजिक विषयांचे परखड विश्लेषण आणि संविधानिक मूल्यांच्या जागृतीसाठीची भूमिका यामुळे बागडे यांच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली. पुरस्कार निवड प्रक्रियेत मुख्य आयोजक तथा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सचिन खंडारे, निवड समिती अध्यक्ष तथा साहित्यिक लेखक विकास सुखधाने आणि निवड समिती उपाध्यक्ष समाधान सरकटे यांची प्रमुख भूमिका आहे.

या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल बागडे यांचे साहित्यिक, सामाजिक, पत्रकारिता आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे. “अण्णाभाऊ साठे यांच्या परिवर्तनवादी विचारांचा वारसा लाभलेल्या या पुरस्कारासाठी झालेली निवड माझ्यासाठी केवळ सन्मान नसून, समाजातील वंचित, उपेक्षित आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी अधिक निर्भीडपणे लिहिण्याची नवी जबाबदारी आहे. पुरस्काराने लेखणी थांबणार नाही, उलट ती अधिक धारदार होईल,” अशी भावना प्रवीण बागडे यांनी व्यक्त केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.