किशोर साहू, मौदा :- पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा पुर्व तयारी मेळावा, सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांना निरोप समारंभ व ज्येष्ठ शिक्षक लिलाधर काळबांडे यांचा निरोप समारंभ अशा प्रकारे तिन्ही कार्यक्रमाचा योग साधुन कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितेश इंगळे, प्रमुख पाहुणे उपाध्यक्ष रणधीर आंबिलढुके, उपाध्यक्ष तंटामुक्ती संजय मेहर , सामाजिक कार्यकर्ते राजेश चोपकर, सदस्य दामोदर देशमुख, पालक गौरीशंकर आंबिलढुके , साधनव्य्यक्ती पं.स.मौदा मच्छिंद्र म्हस्के ,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, सदस्या सुनंदा हटवार, कविता आंबिलढुके उपस्थित होते.
या कार्यक्रम चे प्रास्ताविक मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी केले.आपल्या प्रास्ताविक भाषणात विद्यार्थ्यांना शाळा पुर्व तयारी मेळावा, निरोप समारंभ या बद्दल माहिती विद्यार्थ्यांना दिली. सातव्या वर्गातील विद्यार्थी पहिल्या वर्गापासून ते सातव्या वर्गापर्यंत या शाळेत शिकत होते त्यांना आज निरोप देताना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.![]()
ज्येष्ठ शिक्षक लिलाधर काळबांडे यांनी सुद्धा वर्षभर या शाळेत शैक्षणिक कार्य केले आणि त्यांचा सुद्धा शाल श्रीफळ देऊन सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.शाळेला नेहमी मदत करणारे संजय मेहर, राजहंस चोपकर यांनी सुध्दा शाळेला मदत केली त्यांचा सुद्धा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या सर्व बाबी मुख्याध्यापक यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून व्यक्त केले.या नंतर शैक्षणिक सत्र 2026-2027 या सत्रात पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांची भाषणे झाली त्यात सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि आम्ही पहिल्या वर्गापासून या शाळेत आम्हाला आमच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले ते मार्गदर्शन आम्ही आमच्या सोबत ठेऊ आणि ज्या शाळेत शिक्षण घेण्यासाठी जाणार तेथे सुद्धा आमच्या सरांनी जे मार्गदर्शन केले ते सदैव स्मरणात ठेऊ,असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक राजेश रोहाड यांनी पुस्तके सप्रेम भेट दिल्या. सेवानिवृत्त झालेले जेष्ठ शिक्षक लिलाधर काळबांडे यांनी सुध्दा सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांना कंपास बॉक्स सप्रेम भेट दिली.सर्व सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव ला समई सप्रेम भेट दिली.याप्रसंगी लिलाधर काळबांडे यांनी आपल्या मनोगतातून या शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हितासाठी या शाळेचे मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षकवृंद किती तळमळीने कसे काम करतात यांचा अनुभव प्रत्यक्ष घेतल्यानंतर ही पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जिल्हा स्तरावर तसेच राज्य स्तरावर नावलौकिक केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रम चे संचालन राजेश रोहाड यांनी केले.या कार्यक्रम चे यशस्वी नियोजन करण्यासाठी लिलाधर काळबांडे , सुधीर खंडाईत, सुधीर कांबळे , राजेश रोहाड ,सुजाता बोदेले ,प्रज्ञा रामटेके , संगीता आंबिलढुके , उमेश उके, पुष्पलता उके, कैलास फटिंग यांनी विशेष सहकार्य केले.आभार प्रदर्शन शिक्षिका प्रज्ञा रामटेके यांनी केले.