spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘हिंद की चादर’ कार्यक्रमाच्या तयारीला वेग

नागपूर :- शिख समाजाचे नववे गुरु श्री तेगबहादूर सिंह साहिब जी यांच्या 350 व्या बलिदान दिनानिमित्त नागपुरात येत्या 7 डिसेंबरला आयोजित केलेल्या ‘हिंदी की चादर’ कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला आहे.

राज्य सरकार व श्री. गुरु तेगबहादूर सिंग साहबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम राज्यस्तरिय समितीच्या संयुक्त विद्यमाने नारा भागातील कुकरेजा मैदानावर होणार असलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशीष जयस्वाल उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी राज्यभरातून 3 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. ही संख्या लक्षात घेऊन कार्यक्रमाची आखणी सुरू आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे पाणी पुरवठा. स्वच्छता, विद्युत पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था केली जात आहे. कार्यक्रमस्थळी भाविकांच्या व्यवस्थेची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. हा कार्यक्रम यशस्वीपणे करण्यासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. सदस्यांनी कार्यक्रम स्थळी सुरू असलेल्या तयारीची पाहणी केली व आढावा घेतला. या समितीच्या सदस्यांची बैठक नारा मैदानावर पार पडली. यात आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक यांच्यासह संयोजन समितीतील सुनील भूलगावकर, बबजीत सिंग खडुजा,अवतार सिंग, अंकिता ब्रिजवानी, मोनिका बलवानी यांच्यासह विविध समित्यांचे सदस्य उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.