spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एल.ए.डी. महाविद्यालयात पंतप्रधान मोदी साधणार युवांशी संवाद

नागपूर :- राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर २७ ऑगस्ट रोजी देशभरात ‘विकसित भारत युवा कनेक्ट राष्ट्रीय क्रीडा दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील १,६०० हून अधिक ठिकाणी सहभागी होणाऱ्या ८ लाखांहून अधिक युवकांशी आभासी माध्यमातून संवाद साधणार आहेत. महाराष्ट्र व गोवा राज्यांतील २३ महाविद्यालयांची या कार्यक्रमासाठी निवड झाली असून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून एल.ए.डी. महाविद्यालयाची एकमेव निवड झाली आहे. एल.ए.डी. महाविद्यालयातील कार्यक्रमाला नागपूरच्या महापौर नीता ठाकरे आणि आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू व महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी अरुंधती पानतावणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधानांच्या संबोधनानंतर स्थानिक युवकांशी संवादाचे विशेष सत्र होणार असून, युवकांना त्यांच्या कल्पना, सूचना व आकांक्षा मांडण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ.नंदा राठी, प्राचार्य डॉ.पूजा पाठक तसेच एन. एस.एस.विभागाची चमू परिश्रम घेत आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत प्रचिती बगाडे यांनी दिली. यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थित पूजा पाठक, श्रद्धा पांडे, रश्मी कोचे, पल्लवी कोमावार उपस्थित  होत्या.

Popular Articles