नागपूर :- मागील २० वर्षांपासून नागपूरकरांनी देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिक बांधवांसाठी स्वतः राख्या बनवून सैनिकांना पाठवून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या या उपक्रमासाठी नागपूरकरांचे संयोजक डॉ. निखिल भुते यांच्या पुढाकाराने नागपुरातील सामाजिक आध्यात्मिक महाविद्यालयीन सांस्कृतिक क्रीडा व सैनिक संघटनांच्या संकल्पनेतून इंडियन आर्मीए कारगिल पोस्ट लदाख भारतीय बोर्डवरील सैनिकांसाठी नागपूरकरांच्या वतीने नागपूर महाराज राजे मुधोजी महाराज भोसले यांच्या प्रमुख हस्ते विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांच्या माध्यमातून पाठविण्यात आल्या देशाच्या सीमेवर २४ तास पहारा देऊन देशातील सर्व नागरिकांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना राख्या पाठवून त्यांच्या कार्याला सलाम करून प्रत्येक नागपूरकरांचे कर्तव्य आहे. नागपूरकरांतर्फे दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येत असून या वर्षी या अभियानांतर्गत सैनिकांसाठी राखी पाठवून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे
देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय जवानांप्रती आदर, कृतज्ञता व देशभक्तीची भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही नागपूरकर व तायवाडे कॉलेज, तायवाडे कॉलेज ऑफ फार्मसी व तायवाडे कॉलेज ऑफ नर्सिंग, आणि विविध सामाजिक संस्था व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राखी संकलनाचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला नागपूरकरांसह विविध सामाजिक संघटना व महिला संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जवानांसाठी राख्या उपलब्ध करून दिल्या. विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध सामाजिक संघटना, महिला संघटना आणि नागपूरकरांनी देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी प्रेम, आपुलकी आणि देशभक्तीच्या भावनेतून राख्या तयार केल्या आहेत. या राख्या कारगिल पोस्ट, लदाख येथे तैनात असलेल्या भारतीय जवानांपर्यंत पोहोचविण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे. या देशभक्तीपर उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी व नागपूरकरांनी जवानांसाठी व्यक्त केलेले प्रेम व आपुलकी ही निश्चितच कौतुकास्पद असून, सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांपर्यंत हा प्रेमाचा धागा पोहोचविण्याचे कार्य नागपूरकर व महाविद्यालयाच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले. या अनुषंगाने नागपूरकंरानी सदर राख्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. या राख्या कारगिल पोस्ट, लदाख येथील जवानांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात यावी, अशी विनंती नागपूरकरच्या वतीने करण्यात आली आहे. याप्रसंगी राजे मुधोजी महाराज भोसले, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. निखिल भुते, माजी उपमहापौर व नगरसेवक किशोर कुमेरीया, प्राचार्य डॉ.गीता लोधी, प्रा.विक्रांत चिलाटे, प्रा.डॉ.वंदना ठणगावले, डॉ. वर्षा वैद्य, कमलेश माचेवार, अभिजीत दरवडे सामाजिक कार्यकर्ते राहुल गुप्ता, पंकज बांन्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना राखी बांधून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा नागपूरकरानी दिल्या. कार्यक्रमाचे संचालन डॉ. निखिल भुते, प्रास्ताविक डॉ. वर्षा वैद्य, आभार प्रदर्शन कमलेश माचेवार यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही नागपूरकर पदाधिकारी आणि तायवाडे कॉलेजचे विद्यार्थी आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी रात्र -दिवस अथक परिश्रम केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.








