– मुख्याध्यापक, शिक्षकवृंद सह शालेय व्यवस्थापन समितीची केली स्तुती
किशोर साहू, मौदा :- शुक्रवार (ता. 21 ऑगस्ट) ला पंचायत समिती मौदा येथील नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी लीना वालोदे ,विस्तार अधिकारी संकेत मरसकोल्हे आणि त्यांचे कार्यालयीन गटसाधन केंद्राचे चे सह कर्मचारी यांनी घोटमुंढरी येथील आदर्श जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन पाहणी केली असता शाळेतील वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थी गुणवत्ता, शासनाकडून मिळालेले डिजिटल विविध संसाधने, ICT लॅब, AI लॅब इत्यादी चे सुद्धा निरीक्षण केले व विद्यार्थी समवेत अनुभव घेतले असता विद्यार्थी गुणवत्ता,इतर उपक्रम ,साधनांचा योग्य वापर आणि मुख्याध्यापक ,सर्व शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांची मेहनत व कार्याची स्तुती करून उत्साह वाढवण्यावर भर दिले.

तसेच शाळेच्या अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा माहिती घेऊन,सूचना देऊन मार्गदर्शन केले.शाळा व डायनिंग अपूर्ण बांधकामावर सुद्धा दखल घेतली. त्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक विकास धारगावे,समस्त शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उदय पांडे सह समस्त सदस्यगण यांनी गटशिक्षणाधिकारी लीना वालोदे यांचे आभार मानले.








