spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते नागपूरसाठीच्या ‘५० पी.एम. ई-बसेस’ चे १४ फेब्रुवारी रोजी लोकार्पण

नागपूर :- केंद्र सरकारच्या ‘पी.एम. ई-बस’ (PM e-Bus) सेवा अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या आपली बसच्या ताफ्यात अत्याधुनिक आणि पूर्णपणे वातानुकूलित अशा ५० इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते शनिवार १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता पी.एम.ई-बस सेवा कोराडी आगार येथे आभासी पद्धतीने या बसेसचे लोकार्पण केल्या जाणार आहे.

कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री मनोहर लाल, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्यमंत्री माधुरी मिसाळ,  महापौर निता ठाकरे, उपमहापौ लिला हाथीबेड, सत्तापक्ष नेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्ष नेता संजय महाकाळकर, मनपाच्या प्रभारी आयुक्त वसुमना पंत यांच्य्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

‘पी.एम. ई-बस’ सेवा ही नागपूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यामुळे केवळ प्रवाशांचा अनुभवच सुधारणार नाही, तर ‘ग्रीन आणि सस्टेनेबल मोबिलिटी’च्या स्वप्नालाही गती मिळणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ५० इलेक्ट्रिक बसेस नागपुरात दाखल झाल्या असून, त्या सध्या डेपोमध्ये सज्ज आहेत. केंद्र सरकारद्वारे टप्प्याटप्प्याने एकूण १५० बसेस शहराच्या सेवेत रुजू होणार आहेत. या बसेसमुळे शहराच्या कार्बन उत्सर्जनात घट होऊन स्वच्छ आणि हरित नागपूरच्या मोहिमेला बळ मिळणार आहे

अशा आहेत अत्याधुनिक बसेस

‘पी.एम. ई-बस’ (PM e-Bus) सेवा अंतर्गत प्राप्त होणाऱ्या बसेस या ९ मीटर लांब असून, त्यामध्ये ‘२५+१’ प्रवाशांच्या बसण्याची उत्तम सोय आहे. यात सर्वसमावेशक प्रवासाचा विचार करून, या बसेसमध्ये दिव्यांगांसाठी ‘हायड्रोलिक ई-रॅम्प’ (Hydraulic e-ramp) बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे त्यांना बसमध्ये चढणे आणि उतरणे सोपे व सुरक्षित होईल. याशिवाय केवळ ३० मिनिटांच्या ‘रॅपिड चार्जिंग’वर ही बस २२५ किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकते. यामुळे विनाअडथळा आणि कार्यक्षम सेवा देणे शक्य होणार आहे. या बसेस शहरातील एकूण ११ महत्त्वाच्या मार्गांवर चालवण्यात येणार आहेत.

Popular Articles