किशोर साहू, मौदा, :- आज रविवार (दि.११ऑक्टोबर) ला नरसाळा येथे माँ जगदंबा नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ तर्फे यावर्षीपासून हनुमान मंदिर परिसरात ढोल ताशे गजरात दुर्गा देवीची स्थापन करण्यात आली .त्या प्रसंगी गावकऱ्यांमध्ये खूप मोठा उत्साह दिसून आला. मंडळाचे अध्यक्ष साहिल माहुरे, पदाधिकारी सुरेंद्र ढोबळे, ग्रा.पं. सदस्य परसराम घारड, उदय ठाकरे,स्वीजल माहुरे, श्रेयश शेळके, रोनित नागपुरे, विजय ठाकरे, प्रकाश ठाकरे, आर्यन ठाकरे, नीलकंठ घारड, कमलेश घारड, राजकुमार वकालकार, बाल्या शेळके, अरविंद ठाकरे सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंडळाच्या वतीने अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.








