कामठी :- श्री. सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था, कामठी द्वारा संचालित श्री. माधवराव वानखेडे शारीरिक शिक्षण महाविद्यालयामध्ये ‘श्री शिव छत्रपती पुरस्कार’ विजेते व हिटलर द्वारा आयोजित बर्लिन ऑलिम्पिक मध्ये भारताचे नेतृत्व करणारे स्व. माधवराव वानखेडे यांचा स्मृतीदिन आज 10 ऑक्टो. 2026 ला सकाळी 11.00 वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा किशोरीताई भोयर, संस्था उपाध्यक्षा अनुराधा भोयर, संस्था सचिव व माजी जि.प. अध्यक्ष सुरेश भोयर तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. श्यामकुमार चरडे, प्राचार्य, प्रगती महिला कला महाविद्यालय, भंडारा, किशोरीताई भोयर फार्मसी महाविद्यालय, कामठी चे प्राचार्य डॉ. मिलिंद उमरेकर, संस्था संचालक अनुराग भोयर व सलोनी भोयर यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. दिलीप कोहळे यांनी माधवरावजींच्या जीवन कार्यावर उद्बोधन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन डॉ. सीमा हरडे यांनी केले.
याप्रसंगी विशेष अतिथी कामठी तंत्रनिकेतनचे प्राचार्य मुकेश घोळसे, किशोरीताई भोयर अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य रामेश्वर जायभाये, डॉ. रुपाली पाटील, स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूल, कामठी च्या प्राचार्य डॉ. ईशा मुदलीयार, संस्थेचे लेखापाल अजय हरडे, महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. दिलीप कोहळे, डॉ. सीमा हरडे, डॉ. विलास टेंभुर्णे, प्रा. रविभारती व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.








