जय सेवा गाव नियोजन समितीकडून दशपर्णी अर्कचे उत्पादन व विमोचन

0
55

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- ग्रामपंचायत बोरडा अंतर्गत सराखा येथे बाएफ व मॉयल लिमिटेडच्या उपक्रमांतर्गत निर्मित दशपर्णी अर्क विमोचन करण्यात आले. जय सेवा गाव नियोजन समितीने प्रोजेक्ट मॅनेजर मंजुषा मेश्राम व शेती मार्गदर्शक लिखीराम सिद्राम याच्या मार्गदर्शनात अर्कची निर्मिती करण्यात आली. अर्कचा पिकांना मोठा फायदा झाला आहे.

फायदा बघून शेतकऱ्यांनी २०० लिटर अर्क तयार केल.

शेतकऱ्यांनी तयार केलेल्या दशपर्णी अर्कचे पॅकिंग करून विमोचन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य चेतन जांभुळे, जय सेवा गाव नियोजन समितीचे अध्यक्ष अक्षय राऊत, उपाध्यक्ष प्रमिला इडपाची, सी.आर.पी. वैशाली राऊत, सदस्य आशिष तोंदरे, हिरालाल राऊत, रामदास राऊत, नीलकंठ शेंडे, शंकर दडमल, सारिका जांभुळे, सपना नेवारे व गावातील शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.