spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विभागीय क्रीडा संकुलासाठी शंभर कोटी रुपये वितरीत

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विदर्भातील क्रीडा क्षेत्रासाठी कटिबध्दता

– युवकांना मिळणार क्रीडा क्षेत्रात नवी दिशा

– पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विशेष पाठपुरवठा

नागपूर :- विदर्भातील खेळाडूंना आपल्या क्रीडा कौशल्यात अधिक निपुणता यावी, येथून आंतरराष्ट्रीय पातळीवरचे क्रीडापटू घडावेत या उद्देशाने मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे क्रीडा सुविधा विकसीत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे क्रीडा संकुलाकरीता मंजूर झालेला निधी वितरीत करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानकापूर येथील क्रीडा संकुल येथे काही महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष भेट देऊन विकास कामाबाबत आढावा घेतला होता. नागपूर महानगरात प्रत्येक प्रभागात व्यापक प्रमाणात उपलब्ध जागेप्रमाणे क्रीडा सुविधा देण्याचे निर्देश त्यांनी महानगर पालिका प्रशासनाला देऊन क्रीडा क्षेत्रावर विशेष भर दिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाला गती देण्यासाठी विशेष पाठपुरावा करुन हा शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन घेतला आहे.

शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणेच्या धर्तीवर नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलाला यापूर्वीच अद्ययावतीकरण व नुतनीकरण करुन त्यास राज्यस्तरीय क्रीडा संकुलाचा दर्जा देण्यात आलेला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील क्रीडा विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. या अनुषंगाने नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलाचे सुधारीत अंदाजपत्रकात अंतर्भूत असलेल्या विविध कामांपैकी इमारत बांधकामे व क्रीडा सुविधांच्या प्रस्तावास उच्चस्तरीय सचिव समितीच्या ११ मार्च २०२४ च्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.

राज्यस्तरीय क्रीडा संकुलासाठी प्राप्त झालेल्या एकूण ७४६.९९ कोटी रुपयाच्या सुधारीत अंदाजपत्रकास एक विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. यानुषंगाने शासन निर्णयानुसार अनुक्रमे २.८० कोटी रुपये, ४० कोटी रुपये आणि ६० कोटी रुपये असे एकुण १०२.८० कोटी रुपये निधी वितरीत करण्यात आलेला आहे.

शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या धर्तीवर नागपूर विभागीय क्रीडा संकुलाचे अद्ययावतीकरण व नुतनीकरणात स्विमिंग पूल, स्क्वॅश कोर्ट, टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, आर्चरी रेंज, हॉकी, फुटबॉल पॅव्हेलियन इ. खेळांच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारण्यात येणार आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.