– रोहित पवार यांच्या उपस्थितीत आंदोलन; धान बोनस, ऊस-दूध दरवाढीसह कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देण्याची मागणी
हंसराज,भंडारा मोहाडी :- शेतकरी, शेतमजूर, युवक, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी मोहाडी येथे धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित केले. धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेला बोनस तातडीने देण्यात यावा, ऊस व दूध दरात वाढ करावी तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केल्याप्रमाणे ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान तातडीने देण्यात यावे, या प्रमुख मागण्या मोर्चातून करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता त्यांच्या हक्काचा पैसा आणि ठोस निर्णय तातडीने घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रोहित पवार यांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला बळ मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे, सुनील भुसारा, सलील देशमुख, रविकांत बोपचे, अतुल वांदिले, हिरालाल नागपुरे, राणीताई ढेंगे, संदिप ताले, नितेश मारवाडे, चंद्रशेखर भिवगडे, उमेश पाटील, हंसराज आगासे, आटूभाऊ तुरकर, सेवक चिंधालोरे, हेमराज नागफासे, मेहताबसिंग ठाकूर, गौरव नवरखेले, देवश्री सहारे, मधुकर चौधरी आणि अनिल जिभकाटे यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.





