spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कॅन्सर ग्रस्तांसाठी कमी दरात लस द्या – प्रवीण दटके

 

नागपूर  १८ : कॅन्सरवरील उपचार अधिक सोपे व्हावेत तसेच व्यापक जनजागृती मोहीम हाती घ्यावी, यासाठी आमदार प्रवीण दटके यांनी लक्षवेधीच्या चर्चेदरम्यान सभागृहाचे लक्ष वेधले.
मा.नितीन गडकरींसोबत कॅन्सर ग्रस्तांकरिता कामाला सुरुवात केली होती. नागपुरात रुपाराय नावाच्या नगरसेविका होत्या , त्यांनी ब्रेस्ट कॅन्सरकरिता पहिल्यांदा CSR मार्फत निधी आणला आणि 5000 भगिनींना लस देण्यात आली. नागपुरातील 20 हजार मुलींना लस देण्याच कार्य नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने पूर्ण झालं.

या कामाला अंकुर सीड्स , बिर्ला फाउंडेशन आणि नितीन गडकरी यांनी मोठ्या प्रमाणात CSR उपलब्ध करून दिला. पहिली लस खूप महाग मिळाली होती ती आता 945 रुपयाला अदर पूनावाला यांनी सव्वा लाख लस अजित पवार साहेबांना दिले आहेत अशी माहिती असल्याचे दटके यांनी सांगितले.

दुर्दैवाने विदर्भ कॅन्सरची राजधानी होत आहे, हे दुःखाने सांगावं लागत असल्याचे प्रवीण दटके यांनी व्यक्त केले. ब्रेस्ट कॅन्सर हा जेनेटिक होतो किंवा राहणीमान आणि खानपानातील विसंगती यामुळे वाढत आहे तसेच सर्वाइकल कॅन्सर एसपीव्ही नावाच्या एका वायरल वायरसमुळे होतो.
या दोन्ही करता ही लस महत्त्वाची आहे. वय वर्ष 9 ते 16 – 17 वर्षापर्यंत मुलींना देण्याचा प्रघात आहे पण जागरूकता नसल्यामुळे नागरिक घाबरतात याकरता लोक जागरणाची गरज आहे त्यासाठी शासन जागृती करणार का असा प्रश्न दटके यांनी विचारला.

मोठ्या प्रमाणात सध्या वजन कमी करण्याकरता भगिनी औषध घेतात तसेच मातांना मूलबाळ होत नाही त्या अनेक ट्रीटमेंट घेतात त्यातून ही आजार उद्भवण्याची शक्यता बळवली आहे. त्यामुळे , याबाबतीत आवश्यक जागृती उपाययोजना सरकारने हाती घ्याव्यात असे दटके म्हणाले.

सगळ्या योजनांमध्ये पहिले जे पेट स्कॅन करावं लागतं ते मोफत नाही आणि त्याच्याकरताच पहिल्यांदा 25 हजार रुपये लागतात त्यामुळे किमान पेट स्कॅन ची सुविधा सरकारी हॉस्पिटल मधून करून द्यावी.

तसेच, आमदार निधी मधून कॅन्सर ची लस देण्याकरिता प्रावधान करण्याची तरतूद करावी अशी मागणी प्रवीण दटके यांनी केली. कॅन्सर हॉस्पिटल करिता ७२ कोटी रुपयांची काम मंजूर झाली ,आजपर्यंत तीन वर्षात 15 कोटी आले विशेषतः महिलांच्या कॅन्सरसाठी हॉस्पिटल करावे अशी विनंती दटके यांनी केली .

नगरपरिषद आणि महानगरपालिका आहेत त्यांच्याही बजेटमध्ये कॅन्सर करता विशेषता भगिनींकरता मातांकरिता निधीचे आरक्षण ठेवावं अशी विनंती दटके यांनी केली.

यावेळी कॅन्सर बाबतीतला अवेअरनेस अवेरनेस नक्की वाढवला पाहिजे, गैरसमजातून संशयित आहे म्हटल्यानंतर सुद्धा माणूस घाबरून जातो पण त्याच्यापेक्षा वस्तुस्थिती पाहता अनेक लोक बरे होतात. त्यासाठी आमच्या विभागाच्या वतीने अतिशय प्रभावी अशी मोहीम घेतली आहे.तसेच पेट स्कॅनच्या बद्दलच्या सुविधा टर्सरी केअर मध्ये सुद्धा करता येते याबाबत शिक्षक आणि महानगरपालिकांच्या आस्थापनांमध्ये असणाऱ्या सगळ्या हॉस्पिटल्स मिळून राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातली एक बैठक लावण्यासाठी आम्ही विनंती करतोय ते स्वतः सकारात्मक आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळ्या सुविधा व ते महात्मा फुले जीवनदायी योजनेतील असेल वेगवेगळे योजनांचा आधार घेऊन लोकांना अधिक सुविधांसाठी धोरण तयार करत आहे असे आरोग्य मंत्री श्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले .
तसेच आमदार निधीच्या बाबतीत वित्तमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून विशेष बाब म्हणून आमदार निधीतून लस देण्याबाबत चर्चा करू आणि नागपूर साठी आवश्यक ते प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करू असे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आश्वासित केले.

@filephoto

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.