अखिल खेडूला कुणबी समाज संस्थे तर्फे विदर्भ स्तरीय समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
नागपूर दि. : अखिल खेडूला कुणबी समाज नागपूर यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात 22 जून रोजी आशीर्वाद नगर, रिंग रोड म्हाळगी नगर चौक येथील समाज भवनात मार्च 2025 च्या वार्षिक परीक्षेत 10 वी, 12 वी UPSC / MPSC स्पर्धात्मक परीक्षेमध्ये उत्तीर्ण होवून सरकारी नोकरीत लागलेले तसेच डॉक्टर / MBBS / MD व खेळाडू व इतर प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिप प्रज्वलन व जगद्गुरू संतशिरोमणी तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज व बळीराजा यांचा प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या सत्कार समारंभाला अंदाजे 160 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. समाजातील सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांना मोमेंटो व प्रशस्तीपत्र मान्यवराच्या हस्ते देण्यात आले. तसेच आय ए एस अधिकारी रजत श्रीराम पत्रे यांचा सम्मानचिन्ह व शॉल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले. या समारंभात विद्यार्थ्यांचे पालक व समाज बाधंव आणि भगिनी या कार्यक्रमात चारशे ते पाचशे लोकांची उपस्थिती होती. कार्यकमाचे अध्यक्ष प्रभाकरराव पिलारे, उद्घाटक अँड अनिल ठाकरे, प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक डॉ. प्रा. अभिविलास नखाते (संचालक शिवतीर्थ) विवेक तोंडरे (प्रशासकीय अधिकारी MCED संभाजी नगर व सत्कारमुर्ती रजत श्रीराम पत्रे IAS यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रास्ताविक सचिव सुधाकर भर्रे यांनी केले तर संचालन नंदकिशोर अलोणे व कु.पायल पारधी यांनी केले. डॉ. प्रा. अभिविलास नखाते, विवेक तोंडरे आणि श्री रजत पत्रे यांनी विद्यार्थ्यांना व पालकांसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 22 जुन रोजी समाजाच्या कार्यकमात नुकतीच युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून I.A.S. अधिकारी बनलेले कुणबी समाज रत्न सन्माननीय रतज श्रीराम पत्रे धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती हे खेडूला कुणबी समाजाचे पहिले I.A.S. अधिकारी बनले म्हणूनच यांचा महाराष्ट्र राज्य कुणबी कृती समिती नागपूर विभागाच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी महाराष्ट्र राज्य कुणबी कृती समितीचे अनंतराव भारसाकळे, बाळाभाऊ शिंगणे, मोरेश्वर फुंडे, किशोर येडे, चेतन वडे, क्षितिज ढोबळे, दिनेश हरणे तसेचे नंदकिशोर अलोणे प्रामुख्याने उपस्थित होते. समाजाचे अध्यक्ष श्री प्रभाकरराव पिलारे यांचे अध्यक्षीय भाषण शेवटी झाले. कार्यकम यशस्वी होण्यासाठी अरूण राऊत, दयारामजी सहारे, मनोहर कुथे, वसंतराव देवढगले मोरेश्वर दोनाडकर, गोपीचंद पारधी, चंद्रकांत राऊत, पुरूषोत्तम भोयर, अमोल राऊत, मनमीत पिलारे, सुरज ढबाले, सुनिता अलोणे, . रूपा अलोणे, स्वाती राऊत, मैत्री राऊत आणि समाजातील सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. सरते शेवटी आभार प्रदर्शन भंडाराचे माजी अध्यक्ष मुरलीधरजी भर्रे यांनी केले. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला व समारंभाची सांगता राष्ट्रगीताने झाली.




