नागपूर :- श्रीकृष्ण ज्येष्ठ नागरिक मंडळ दर्शन कॉलनी च्यावतीने १६ डिसेंबर रोजी २०२६ वर्षाच्या कॅलेंडरचे प्रकाशन तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात “आजोबा – आजी आणि नातवंडे : परस्पर नातेसंबंध व जबाबदाऱ्या” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी दर्शन कॉलोनी नंदनवन येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. अविनाश दयाराम करंभे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत आजोबा – आजी व नातवंडांमधील भावनिक, शारीरिक व मानसिक नात्याचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. करंभे यांनी आजी – आजोबांनी नातवंडांच्या संगोपनात कशी सकारात्मक भूमिका बजावावी, त्यांच्या आहार-विहार, संस्कार, स्क्रीन-टाईम, शारीरिक हालचाल व भावनिक सुरक्षिततेकडे कसे लक्ष द्यावे यावर मार्गदर्शन केले. तसेच नातवंडांनीही आजोबा-आजींचा सन्मान, त्यांची काळजी व संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमात दर्शन कॉलनी व परिसरातील ५०० पेक्षा जास्त मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक याप्रसंगी उपस्थित होते. २०२६ कॅलेंडरचे औपचारिक प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितांनी कार्यक्रमाची प्रशंसा करत अशा उपक्रमांची अत्यंत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीकृष्ण ज्येष्ठ नागरिक मंडळ अध्यक्ष वसंत कळंबे, उपाध्यक्ष रमेश वाघमारे व अन्य सभासदांनी आभार मानले व कार्यकारिणीचे अभिनंदन केले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी २०२६ कॅलेंडर प्रकाशन व आजोबा-आजी व नातवंडे परस्पर नातेसंबंध व जबाबदाऱ्या, या विषयावरील सविस्तर मार्गदर्शन









