spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पुण्यश्लोक अहिल्यादेवी ग्रुपचा ‘मंगळागौर’ स्पर्धेत प्रथम क्रमांक

नागपूर :- नवभारत आणि एंजल लेडीज क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रंगीला सावन उत्सव – मंगळागौर स्पर्धे’त पुण्यश्लोक अहिल्यादेवी ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी, अमृत भवन, नागपूर येथे ही स्पर्धा उत्साहात पार पडली. महाराष्ट्रीय संस्कृती, परंपरा, लोककला आणि मंगळागौरीच्या विविध पारंपरिक खेळांचे सुंदर सादरीकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी ग्रुपच्या महिलांनी केले. पारंपरिक वेशभूषा, आकर्षक सादरीकरण, सांघिक सहभाग आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन यामुळे परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत ग्रुपने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या विजयी ग्रुपमध्ये मीनाक्षी लोही, ज्योती कापडे, तेजस्विनी शेकार, अर्चना बुधे, संगीता खुजे, रोहिणी अवजे, कांचन टेकाडे, दीक्षा चावटकर, काजल चावटकर, कामिनी तवले, अश्विनी उरकुडे आणि संजीवनी घुरडे यांचा सहभाग होता. या यशाबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी ग्रुपच्या सर्व सदस्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून, महाराष्ट्रीय संस्कृती व परंपरा जपण्याच्या त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.