बोरी :- बोरी पोलीस अवैध धंदयावर कारवाई करणेकामी पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फतीने माहीती प्राप्त झाली की, भारत विरूध्द न्युझीलँड टी-२० विश्वचषक अंतीम सामना असल्याने बोरी हद्दीत मौजा आसोला शिवार, धवळपेठ पुलाखाली १ इसम सदर सामन्यावर मोबाईल द्वारे लोकांकडुन पैसे घेवुन हार जीतचा जुगार खेळत व खेळवीत आहे. अशा विश्वसनिय माहीतीवरून पोलीस घटनास्थळी पोहचले असता मौजा आसोला शिवार, धवळपेठ पुलाखाली १ संशयीत इसम मिळुन आला. त्यांना विचारपुस केली असता आरोपी १) हर्षल रतनजी देवळे, वय २७ वर्ष, रा. वार्ड नं. ३, आसोला ता. हिंगणा हा मिळुन आला त्याच्या मोबाईल ची पाहणी केली असता गुगल कोम मध्ये NICE 24 या आयडी वरून स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी किकेट सट्टयावर ग्राहकांकडुन ऑनलाईन पैसे घेतल्याचे दिसुन आले. नमुद आरोपीला अधिक विचारपुस केली असता त्याने सदर आयडी आरोपी २) आदिश विनोद डफ, रा. बोरी याचे कडुन विकत घेतल्याची माहीती प्राप्त झाली. पोलीसांनी पंचासमक्ष आरोपीया ताब्यातुन १) अॅड्रॉईड मोबाईल किंमती १०,०००/- रुपये. २) रोख रक्कम ८००/- रुपये असा एकूण १०,८००/- रुपयांचा मुददेमाल जप्त केला.
क्रिकेट सट्टा/बेटिंग लावुन जुगार खेळणाऱ्यांवर धाड
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.