भिवापुर :- भिवापुर पोलीसांना गुप्तबामीदारा द्वारे खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा गोंडबोरी नदीजवळील आकराजवळ पाण्याच्या टाकीपुढे सार्वजनिक ठिकाणी काही इसम ५२ ताशपत्तयांचा जुगार खेळत आहे. भिवापुर पोलीसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळी धाड टाकली असता काही इसम जुगार खेळतांना मिळुन आले. सदर प्रकरणी आरोपी १) रामकुमार मनिराम कुशवाह, वय ३६ वर्ष, रा. हनूमान मंदिरचे जवळ, मरूपार पुनवर्सन, ता. भिवापूर, जि. नागपुर, २) सुनिल डोमाजी लाटकर, वय ३२ वर्ष, रा. वार्ड क. ०१, मरूपार पुनवर्सन, ता. भिवापूर, जि. नागपुर, ३) आकाश कृष्णाजी शेंडे, वय २९ वर्ष, रा. वार्ड क. ०१, मरूपार पुनवर्सन, ता. भिवापूर, जि. नागपुर, ४) अतुल अरविंद मानकर, वय २२ वर्ष, रा. वार्ड क. ०३, मरूपार पुनवर्सन, ता. भिवापूर, जि. नागपुर (५) संकेत शास्त्री भोयर वय २० वर्ष रा. वार्ड क ०१, भागेबोरी, ता. भिवापूर, जि. नागपुर आणि इतर ०३ आरोपी यांच्या विरुद्ध कलम १२ म.जू.का. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीसांनी पंचाासमक्ष ५२ ताशपत्ते, एकुण रोख रक्कम, ७ मोटर सायकल, ४ मोबाईल आणि इतर साहीत्य असा एकुण ४,०५,३३०/- रूपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला आहे.





