Home Latest News रेल्वेत दरोडा टाकणारे आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; साडेचार लाख मुद्देमाल जप्त

रेल्वेत दरोडा टाकणारे आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; साडेचार लाख मुद्देमाल जप्त

0

<p><strong>जळगाव &colon;<&sol;strong> कामायनी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांवर हल्ला करून बॅग हिसकावणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या &lpar;एलसीबी&rpar; पथकाने जळगाव येथे पकडले आहे&period; या कारवाईत साडेचार लाख रुपयांचा रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे&period; सर्व आरोपींना पुढील तपासासाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मंगळवार &lpar;दि&period;9&rpar; रोजी बऱ्हाणपूर–जळगाव मार्गावरील कामायनी एक्सप्रेसमध्ये प्रवासी सुधाकर धनलाल पटेल &lpar;वय ६०&comma; रा&period; बऱ्हाणपूर&comma; मध्यप्रदेश&rpar; यांच्यावर चार आरोपींनी हल्ला करून त्यांच्या पैशांची बॅग हिसकावली&period; त्यानंतर आरोपी रावेर स्टेशनवर उतरून पसार झाले होते&period; तपासाअंत<&sol;p>&NewLine;<p>गुरुवार &lpar;दि&period;18&rpar; रोजी जी&period;एस&period; ग्राऊंड परिसरात संशयित हालचाली दिसत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली&period; त्यानुसार पोलीस पथकाने संशयितांना ताब्यात घेतले&period; संशयितांजवळील पिशवीत साडेचार लाख रुपये आढळले&period; पोलीस चौकशीत संशयित आरोपींनी रेल्वेत दरोडा टाकल्याची कबुली दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>किरण पंडीत हिवरे &lpar;३२&comma; रा&period; भात्तखेडा&comma; ता&period; रावेर&rpar;&comma; अजय सुपडू कोचुरे &lpar;२५&comma; रा&period; खिडी&comma; ता&period; रावेर&rpar; &comma; हरिष अनिल रायपुरे &lpar;२५&comma; रा&period; प्रतापपुरा&comma; बऱ्हाणपूर&comma; म&period;प्र&period;&rpar;&comma; गोकुळ श्रावण भालेराव &lpar;२७&comma; रा&period; डांभुर्णी&comma; ता&period; यावल&rpar; असे अटक आरोपींची नावे आहेत&period; जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे पोलीसांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>पोलीस अधीक्षक डॉ&period; महेश्वर रेड्डी&comma; अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोपान गोरे&comma; प्रितम पाटील&comma; यशवंत टहाफळे&comma; बबन पाटील&comma; सचिन घुगे&comma; प्रदीप सपकाळे&comma; मयुर निकम यांचा सहभाग होता&period; तांत्रिक मदत गौरव पाटील व मिलींद जाधव यांच्या पथकाने ही कारवाई पार पडली&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; पुढारी<&sol;p>&NewLine;

Exit mobile version