तिरोडा :- राष्ट्रीय युवा दिवस व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. 12/01/2026 रोज सोमवार ला अटल बिहारी वाजपेई सभागृह तिरोडा येथे गोंदिया जिल्हा युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष रोहित अग्रवाल यांच्या नेतृत्वात आणि जिल्हाध्यक्ष ओमजी कटरे यांच्या मार्गदर्शनात व सन्मानीय जिल्हाध्यक्ष महिला आघाडी गोंदिया जि.प.सदस्य तुमेश्वरी बघेले , समाज कल्याण सभापती रजनी कुंभरे जि.प. गोंदिया, उपाध्यक्ष मदन पटले, जि.प. सदस्य प्रविण पटले, उपसभापती सुनंदा पटले प.स. तिरोडा, नवनिर्वाचित नगराध्यक्ष अशोक असाटी व सर्व भाजपाचे सभापती,उपसभापती, जिल्हा परीषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,नवनिर्वाचित न.प.सदस्य ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडल अध्यक्ष व महामंत्री भाजपा पदाधिकारी व युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.यापूर्वी रोहित जमईवार यांना सोशल मिडीया प्रमुख म्हणून जबाबदारी होती त्यात जमईवार यांनी पक्षाचे विचार,ध्येय,धोरण,योजना व युवकांमध्ये आपली वेगळी ओळख बनविली आणि सोशल मिडीयाच्या माध्यंमातून संघटित केले व शासकीय योजनांचा लाभ सुध्दा त्यांना मिळवून दिले आणि स्वताःशी प्रत्यक्ष युवक व नागरिकांना जुडवून घेतले .
त्यांचे कार्यशैली बघून पक्षाने त्यांना मंडळ उपाध्यक्ष मह्णून जबाबदारी सोपविली . जमईवार यांची निवड झाल्यामुळे अर्जुनी मंडळात युवकां मध्ये उत्साह निर्माण झाला आहे आणि स्थानिक नागरिकां मध्ये त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. जमईवार यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय पक्ष श्रेष्ठींना व मित्र परिवाला दिले व सर्वांचे आभार मानले .




