रामटेक सचिन चौरसिया ०३ : भारतीय जनता पार्टीच्या रामटेक शहर अध्यक्ष पदी रजत गजभिये यांची निवड जाहीर करण्यात आली. रामटेक शहरातील भाजपाचा तरुण तडफदार चेहरा अशी रजत गजभिये यांची ओळख आहे. भारतीय जनता पार्टी रामटेक शहर अध्यक्षाची निवडणूक लोकशाही पद्धतीने घेण्यात आली असून या निवडणुकीला जिल्ह्यातून महामंत्री रिंकेश चवरे, मनोज चवरे व उदयसिंगजी यादव ही उपस्थित होते. सुरुवातीला प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी नावाची चर्चा करून सर्वाच्या मतांनी रामटेक शहर भाजपचे अध्यक्षपदी श्री रजत गजभिये यांची निवड करण्यात आली. त्यावेळी भारतीय जनता पक्षाची नेते माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, जिल्हाउपाध्यक्ष संजय मूलमुले, राहुल किरपान, विवेक तोतडे, ज्ञानेश्वर ढोक, उमेश पटले, संजय बिस्मोगरे, करीम मालधारी, हुसेन मलधारी, रामानंद आडामे, चंद्रकांत बैस, वनमाला चौरागडे, कविता मूलमुले, चित्रा धूरई, उज्वला धामगाये, पद्मा ठेंगरी, लता कामळे, नेहा गावंडे इत्यादी सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपा रामटेक शहर अध्यक्षपदी रजत गजभिये यांची निवड.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.




