रामटेक सचिन चौरसिया ०३ :– जयसेवा आदर्श हायस्कुल पवनी येथील प्रयोगशाळा परिचर डी. डी. नागपुरे (दि.३०) सोमवारला हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचे पवनी येथे सेवानिवृत्ती सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शीतल मरकाम, प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून राजे वासुदेवशहा टेकाम व सुखदेवजी सय्याम हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सौं.सुमित्राताई टेकाम, डॉ. नरेंद्रजी कोडवते, पुरुषोत्तमजी कुळमेथे, मडावी सर, बडवाईक सर, मडावी मॅडम, सरियाम साहेब आदी सर्व संस्थाचें पदाधिकारी उपस्थित होते. सोबतच नागपुरे यांच्या परिवाराचे सदस्यसुद्धा उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सरियाम मॅडम ह्याही प्रामुख्याने उपस्थित होत्या. उपस्थित सर्व मान्यवरांनी नागपुरे यांच्या सेवेची महिमा याप्रसंगी व्यक्त केली. याप्रसंगी नागपुरे व त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या शाल -श्रीफळ देऊन यथोचित्त सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत कळंबे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन धोटे सर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने झाली
प्रयोगशाळा परिचर नागपुरे यांचा सेवानिवृत्ती सत्कार.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



