spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राजकिय सुडापोटी दलित कुटुंबाला रेशन देण्यास नकार

नागपूर :- सत्यफुला पुष्पराज मेंढे रा. हनुमान नगर बुटीबोरी ता. नागपूर ग्रामीण यांना बुटीबोरी नगरपरिषदेला मुलानें उमेदवार म्हणून नामांकन दाखल केल्यापासून म्हणजे गेले दोन महिन्यापासून रेशन दुकानदार सुजात अकबर शेख यांनी रेशन देण्यास नकार दिला आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून त्या रेशन दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अरूण लाटकर व कैलास मडावी यांनी दि. 20 जानेवारी रोजी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन दिले. दलितांनी प्रस्थापित व्यवस्थे विरूध्द आवाज उचलल्यास त्याचे असेही परिणाम होवू शकतात याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. मेंढे कुटुंब अत्यंत गरिब असून त्यांचेजवळ रेशनचे बीपीएल कार्ड आहे.

दुकान जरी सुजातचे असले तरी त्यांचे भाउ सरफराज शेख हेच दुकानाचा सर्व व्यवहार पाहतात. सरफराज शेख हे गेले दोन वेळा बुटीबोरी नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणूकीत त्यांच्या पत्नी निवडून आल्या आहेत. मेंढे परिवारातील आकाश पुष्पराज मेंढे यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा च्यावतीने दलित राखीव जागेसाठी निवडणूक लढली व त्यात ते पराभूत झाले. नामांकन दाखल केल्यापासूनच त्याचे परिवाराला सांगून रेशन बंद करण्यात आले. याआधी गेले 5 वर्षाहून अधिक काळ त्यांना याच दुकानातून रेशन देण्यात येत आहे. तसेच दुसरीकडे गेले अनेक वर्षे त्यांना अर्धेच धान्य (40 किलोऐवजी 20 किलो) देण्यात येत होते.

त्याचे सोबत याबाबतीत आकाश मेंढे यांचेशी झालेल्या संभाषणातून राजकिय व जातीयवाद फैलावणारे असे आरोप शेख यांनी केले आहेत. प्रशासनाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेवून कारवाई करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.