spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कलियुगातील संशयाला दूर करणारी ‘रामकथा’- डाँ. कुमार विश्वास

– कुमार विश्वास यांच्या रामकथेने झाले रामनगरी चे वातावरण राममय 

– अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण  

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- डाँ. कुमार विश्वास यांची भागवत कथा, विशेषतः त्यांची लोकप्रिय मालिका “अपने अपने राम”, पारंपारिक कथांपासून दूर जाते, आधुनिक संदर्भात रामायणातील जीवन कौशल्ये, प्रतिष्ठा आणि मानवी संवेदनशीलता सादर करते. ते त्यांच्या काव्यात्मक शैली, दोहे आणि शक्तिशाली पठणातून राम आणि कृष्णाच्या विषयांना एकमेकांशी जोडतात. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामनगरीत क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवनिमित्य पहिल्या दिवशी (दि.३१) रामकथा वाचक डाँ. कुमार विश्वास यांच्या ‘अपने अपने राम’ या एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन रामटेक येथील नेहरू मैदानात करण्यात आले होते. रामटेक महोत्सवाच्या प्रारंभ अत्यंत भावुक वातावरणात झाला. कथेला सुरूवात करण्यापूर्वी स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून या तीन दिवसीय महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावर राज्याचे वित्त राज्यमंत्री आशिष जवस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन, एसडीओ प्रियेश महाजन, तहसीलदार रमेश कोळपे, बिडीओ जयसिंग जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. कुमार विश्वास यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे उदाहरण दिले. डॉ. कलाम साहेब विद्याथ्यांशी संवाद साधताना समाधिस्त झाले. जनसेवेच्या कामात मृत्यू हे मृत्यू नसून खऱ्या अर्थाने मोक्ष असतात. अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. श्रीराम कथा आणि वर्तमानात प्रभू श्रीरामांच्या जीवनातील मूल्यांचे महत्व अत्यंत सोप्या शब्दात मांडत तरुणाईला धर्माशी जोडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला आहे. विविध ठिकाणी साधू संत ही कथा असंख्य लोकांपर्यंत पोहोचवित आहेत. कलियुगाच्या वृक्षावर बसलेल्या संशयरूपी पक्षाला दूर करणारी ही कथा असून आजच्या काळात श्रीराम कथेची संजीवनी युवकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे.विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाली अवघी रामनगरी महोत्सवाच्या अनुषंगाने शहरात स्वच्छता, साफसफाई, ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली. गांधी चौक ते नेहरू मैदानापर्यंतची विद्युत रोषणाईने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आयोजनामध्ये अडथळा येऊ नये यासाठी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडून विशेष प्रयत्न करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.