– दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते व पालकंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रमा नगर उडाणपुलाचे लोकार्पण.
कामठी :- मागील ७ वर्षापासुन सुरू असलेले रमानगर रेल्वे उडान पुलाचे रखडलेले बांधकाम पुर्णत्वास आले असुन येत्या २9 सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता केंद्रीय सडक परीवहन व महामार्ग मंत्री, नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते व महसुल मंत्री, महाराष्ट्र राज्य व नागपुर जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
रमा नगर उडाण पुल धम्मचक्र प्रवर्तन दिनापूर्वी वाहतुकीसाठी खुला व्हावा व ड्रॅगन पॅलेसला येणा-या लाखो लोकांना सुरक्षित पणे येणे जाणे करता यावे यासाठी ॲड. सुलेखा कुंभारे यांनी प्रशासनाला अनेक वेळा निवेदन दिले तसेच बहुजन रिपब्लिकन एकता मंच द्वारे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला होता. अस्खेर ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या प्रयत्नाला यश आले असुन कामठी वासीयांना होणा-या त्रासापासुन सुटका मिळणार आहे.
रमा नगर उडाण पुलावे बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे ९९ टक्के पूर्ण करण्यात आले आहे. आठ दिवसापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुलाची पाहणी केली होती. यावेळी उर्वरीत कामे त्वरीत पूर्ण करण्याच्या संबंधीत विभागाला सुचना केल्या होत्या, अखेर उडान पुल जनतेसाठी खुला होण्यास प्रशासनाला मुहुर्त सापडला असुन कामठीतील नागरीकांना दिलासा मिळणार आहे.
उल्लेखनीय आहे की, दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस येथे ८ ते १० लाख अनुयायी भेट देत असतात दरवर्षी यामध्ये वाढ होत आहे, सध्या कामठी येथे मेट्रो रेल्वेचे बांधकाम सुरू असल्यामुळे कामठी कन्हान मार्गावर बॅरीकेट लावुन रस्ता अरूंद करण्यात आला आहे. त्यामुळे ड्रॅगन पॅलेसला येणा-या अनुयायांना येणे-जाणे त्रासदायक झाले होते. बस, चारचाकी वाहणे ड्रॅगन पॅलेस परिसरात येतू शकत नव्हती व नागरीकांना मोठी गैरसोय होत होती. परंतु आता रमा नगर उडान पुल नागरीकांसाठी खुला होणार असल्यामुळे नागरीकांची गैरसोय दुर होईल असा विश्वास ॲड. सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केला.




