रामटेक बसस्थानकाचााचा बांधकाम वेग अत्यंत संथ, प्रवाशांना होत आहेत मोठ्या गैरसोयी

0
59

 

सचिन चौरसीया, प्रतिनिधी
रामटेक, ता. ३ – रामटेकच्या नव्या बसस्थानकाच्या बांधकामासाठी तब्बल १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, मार्च २०२५ मध्ये वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. हे काम १६ महिन्यांत, म्हणजेच जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। मात्र, प्रत्यक्षात कामाचा वेग अत्यंत कासवाच्या गतीने सुरू असून, प्रवाशांना आणि बससेवेच्या संचालनात अनेक अडचणी येत आहेत। जुन्या बसस्थानकाच्या इमारतीचे काम उन्हाळ्यात पाडून पूर्ण केले गेले आणि त्या ठिकाणी नव्या बसस्थानकाचे बांधकाम सुरू झाले आहे बससेवेच्या सुरळीत संचालनासाठी तात्पुरता शेड उभारण्यात आला आहे. प्रवासी आणि बस चालकांना या शेडमध्ये सुविधांचा अभाव आहे, त्यामुळे गैरसोयी वाढल्या आहेत सध्या पावसाळ्यात पायाभरणीच्या कामात बेसमेंटसाठी मोठा खड्डा खोदण्यात आला, ज्यात पाणी साचल्याने काम संथ गतीने सुरू आहे आणि अपघाताचा धोका आहे।

या बसस्थानकाचे बांधकाम पाहणाऱ्या अभियंता प्रांजली यांनी सांगितले की, पायाभरणीच्या खड्ड्यात साचणाऱ्या पाण्यामुळे कामावर परिणाम होत आहे. कामाला गती देण्यासाठी ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले।

बांधकामाची गती वाढवून नव्या बसस्थानकाचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी श्रमिक आणि प्रवासी वर्गातून मागणी होत आहे. कार्य पूर्ण झाले तरच प्रवाशांना आवश्यक सुविधा वेळेत मिळू शकतील, अन्यथा ज्या गैरसोयी आता सुरू आहेत त्या पुढेही कायम राहण्याची भीती व्यक्त होत आहे।