कन्हान :- राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मॉ साहेबांची जयंती दिनी ग्रामिण पत्रकार संघ कन्हान व्दारे मॉ जिजाऊ मॉ साहेबाना अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.
सोमवार (दि.१२) जानेवारी २०२६ ला ग्रामिण पत्रकार संघ कार्यालय तारसा रोड चौक महाकाली कॉमप्लेक्स कन्हान येथे ग्रामिण पत्रकार संघ कन्हान अध्यक्ष मोतीराम रहाटे यांच्या अध्यक्षेत आणि केडीके इंग्रजी शाळा टेकाडी चे संचालक अविनाश कांबळे व बाल शिवबा शिवांश निलेश पंडितकर यांचे हस्ते मॉ जिजाऊ च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संघाचे सचिव सुनिल सरोदे हयानी मॉ जिजाऊ च्या मौलिक कर्तव्या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास ग्रामिण पत्रकार संघ कन्हान चे कार्याध्यक्ष कमलसिंह यादव, पत्रकार ऋृषभ बावनकर, मोहन रंगारी, जयंता कुंभलकर, किशोर वासाडे, आकाश पंडीतकर प्रामुख्याने उपस्थि त राहुन राजमाता जिजाऊ हयाना पुष्प अर्पण अभिवादन करून जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.



