Monday, April 27, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जनतेचे सेवक विधानसभा आश्वासन समितीचे यशस्वी अध्यक्ष म्हणून रवी राणा यांची वेगळी ओळख

” विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष “म्हणून आमदार रवीभाऊ राणा यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. सर्वाधिक आश्वासनांची पूर्तता करणारे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत विधानसभा पातळीवर त्यांचा गौरव करण्यात आला सन्मानित करण्यात आले आहे. प्रशासनातील निर्णयक्षमता आणि लोकहिताचा ठाम दृष्टिकोन ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये मानली जातात. विधानसभा आश्वासन समिती ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असलेली समिती आहे. आमदार महोदय सभागृहात लोकाभिमुख समस्या मांडतात, त्यावर विद्यमान मुख्यमंत्री व मंत्रीमंडळातील मंत्री आश्वासने देतात आणि त्या आश्वासनांची पूर्तता व अंमलबजावणी करणे हे या समितीचे कार्य असते. ही जबाबदारी पूर्ण वेळ देऊन आमदार रवी राणा प्रभावीपणे पार पाडत आहेत. यावरून अध्यक्ष म्हणून ते लोकांना न्याय देण्यासाठी किती मोठे कार्य करत आहेत, याची कल्पना येते. मोठे कार्य वरील कृतीतून दिसून येते.

आमदार रवी राणा हे चौथ्यांदा निवडून आले आहेत. त्यांच्याकडे कोणताही राजकीय वारसा किंवा घराणेशाही नसून, त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेच्या आशीर्वादामुळे त्यांनी ही यशस्वी वाटचाल केली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सहकार्याने त्यांनी मतदारसंघातील सर्व नागरिकांसाठी लोकाभिमुख कामे केली आहेतकरतआहेत. जनतेशी आपुलकीने संवाद साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांची काळजी घेणे ही त्यांच्या राणांचे कार्याची खासियत आहे.

बडनेरा मतदारसंघात ‘एकाच छताखाली शासकीय व निमशासकीय सेवा’ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी अभिनव मोहिमेअंतर्गत विशेष शिबिरांचे आयोजन या पुर्वी ही केले आहेत आताही नियोजन आहे. या शिबिरांमधून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यात आला. ३७०पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ मिळवून देण्यात ते यशस्वी ठरणार असून, या उपक्रमाला राज्य सरकारच्या माननीय मुख्यमंत्री व पालकमंत्री स्तरावरूनही सहकार्य मिळाले. या कार्यक्रमाचे उद्घघाटन पालकमंत्री यांचे शुभहस्ते होणारं असल्याचे बोलले जात आहे.

याशिवाय, हनुमानगढी परिसरातील निसर्गरम्य पर्वतरांगांमध्ये नैसर्गिक पर्यटन स्थळ निर्मिती विकासासाठी माननीय मुख्यमंत्री व पालकमंत्री यांचे कडून विकास निधी मंजूर करण्यात आला आहे. शहरातील नागरिकांना शुद्ध हवा व निसर्गाचा अनुभव मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. तसेच हनुमानगढी परिसरातील इंद्रेश्वर मंदिर येथे प्रजापिता ब्रह्माकुमारीजच्या ‘ओम शांती’ केंद्राची स्थापना करण्याचाही संबधित स्टस्टी कडून प्रस्ताव पुढे आला येतं असल्याची ऐकिवात आहे.

लोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणारे रवीभाऊ राणा हे ‘भागीरथ’ म्हणून ओळखले जातात. समाजातील वंचित आणि गरजू घटकांपर्यंत विकास पोहोचवण्याचा त्यांचा ध्यास कायम दिसून येतो. जनतेच्या आशीर्वादातून उभा राहिलेला लोकनेता आमदार रवीभाऊ राणा त्यांच्या वाढदिवसानिमित्त उमेश महादेवराव ढोणे त्यांना शुभेच्छा देतो . इतरांच्या कडून ही शुभेच्छा व्यक्त करण्यात येत असून, भविष्यातही त्यांच्या हातून अधिकाधिक लोकहिताचे कार्य घडावे, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.