spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करा – विजयलक्ष्मी बिदरी

– 30 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार

– विभागात 1 लाख 22 हजार 233 अर्ज प्राप्त

नागपूर :- नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. विभागात आतापर्यंत 1 लाख 22 हजार 233 मतदार नोंदणी अर्ज प्राप्त झाले आहे. यापैकी 95 हजार 500 प्रत्यक्ष तर 26 हजार 733 अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिली.

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दिनांक 6 नोव्हेंबरपर्यंत 1 लाख 22 हजार 233 अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये नागपूर जिल्ह्यातून 40 हजार 448, वर्धा 13 हजार 042, भंडारा 14 हजार 414, गोंदिया 18 हजार 139, चंद्रपूर 24 हजार 509 तर गडचिरोली जिल्ह्यातून 11 हजार 683 अर्ज प्राप्त झाले आहेत.

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरु असून नोंदणीकरीता विहित फार्म (नमुना-18 व नमुना-19) संकेतस्थळावर फार्म उपलब्ध आहे. पदवीधर मतदारसंघासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा देखील उपलब्ध आहे. इच्छुकांनी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज सादर करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त बिदरी यांनी केले आहे. दिनांक 25 नाव्हेंबर ते 10 डिसेंबर, 2025 या कालावधीत नागरिकांना या यादीविषयी दावे व हरकती सादर करण्याची संधी मिळेल. मतदारांची अंतिम यादी दिनांक 30 डिसेंबर, 2025 रोजी प्रसिध्दी होईल.

मतदार नोंदणीसाठी आवश्यक पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे व संबंधित माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अद्यापपर्यंत अर्ज सादर न केलेल्या पात्र पदवीधरांनी तात्काळ आपली नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.

Popular Articles