spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जनावरांची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या आरोपी विरूध्द गुन्हा नोंद ३७ म्हशींची सुटका, स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कामगिरी

कन्हान :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, ट्रक क्र. एम एच ०४ एम डी ९५६९ मध्ये अवैधरित्या जनावरांची वाहतुक केली जात आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पथकाने बोर्डा टोलनाका जवळ नाकाबंदी केली असता नाकाबंदी दरम्यान ट्रक क्र. एम एच ०४ एम डी ९५६९ येताना दिसले, पोलीसांनी वाहन थांबवुन तपासणी केली असता चालक नामे- शोहेब शहजाद पठाण, वय ३२ वर्ष, रा. खांदपूर, ता. जि. उरैया (उत्तरप्रदेश) हा मिळुन आला. पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ३७ म्हशी मिळुन आल्या. नमुद जनावरांना कोणतीही चारापाण्याची सोय न करता, अत्यंत कमी जागेत दाटीवाटीने कोंबुन, शिंगाला व पायाला आखुड दोरखंडाने बांधुन वाहतुक करीत असल्याचे दिसुन आले. पोलीसांनी पंचासमक्ष घटनास्थळावरून १) ट्रक क्र. एम एच ०४ एम डी ९५६९ किंमती २०,००,०००/- रू. २) ३७ जनावरे (म्हशी) किंमती ११,१०,०००/- रूपये असा एकुण किंमती ३१,१०,०००/- रूपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.

नुमद प्रकरणी आरोपीविरूध्द कलम ११(१) (क) (ड) (ज) (इ) (फ) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Popular Articles